कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) गेल्या काही दिवसांपासून मुरुडच्या तहसीलदार रजिस्ट्रार कार्यालय परीसरात वाढलेले गवत, कचरा घाणीचे साम्राज्य पसरले असून विविध कामा निमित्त येणाऱ्या नागरिक व संबंधित अधिकारी वर्गाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येथील तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस रजिस्ट्रार कार्यालय असून जवळपास शौचालय, प्रसाधनगृह आहे.शहरासह तालुक्यातून आपल्या विविध कामांसाठी ये-जा करणा-यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो.
पावसाळा सुरु होऊन महिने दोन महिने होतात तोच या परीसरात गवत आणि कचरा घाणीचे साम्राज्य पसरले आहे.कार्यालयांच्या मागील बाजूस झाडी झुडपे वाढली असल्याने वेळप्रसंगी सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून काही धोका उद्भवल्यास जबाबदार कोण ? असा सवाल विचारला जात आहे.याठिकाणी शौचालय प्रसाधनगृह असून बाहेरुन आपल्या कामासाठी येणाऱ्या महिलांची परवड होत असल्याची चर्चा आहे.
शासनाच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या