कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर) मुरुडमध्ये अँटीकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया रायगड टीमतर्फे दत्त मंदिर परिसरात नॅशनल चीफ सेक्रेटरी धनंजय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी दत्तमंदिर परिसरात विविध जातीची एकूण ३५ झाडें लावण्यात आली.
अँटीकरप्शन फाउंडेशनच्या रायगड जिल्हा चेअरपर्सन प्रिया कर्णिक,लिगल अडव्हाईसर ॲड.श्रद्धा वैद्य तसेच डिस्ट्रिक्ट चीफ इंचार्ज रुपेश दांडेकर,डिस्ट्रिक्ट ॲडव्हाईझर अमोल शेडगे, माजी तहसीलदार नयन कर्णिक,माजी सैनिक अनिल विरकूड,विजय वाणी,सदस्य अमरदीप साळुंके,अशोक रणदिवे,संदेश माळी,महेश साळुंके, अभिजित भायदे,मंगेश कौलकर,राहुल कासार,सचिन नाईक शालेय विद्यार्थी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या