कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) जागतिक नेत्रदान दिवसानिमित्त लायन्स क्लब मुरुड-जंजिरा शाखेतर्फे
मंगळवार दि.१०जून २०२५ रोजी सायंकाळी ५-०० वा.येथील लायन्स वीजन सेंटर मसाला गल्ली मार्गे रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लब मुरुड-जंजिरा अध्यक्ष मकरंद कर्णिक यांनी दिली आहे.
यादिवशी लायन्स वीजन सेंटर पासून सायंकाळी ५-०० वा. रॅली निघणार असून मसालगल्ली बाजारपेठ मार्गे परत असा मार्ग रहाणार असून यावेळी उपस्थितांचे नेत्रदानचे अर्ज भरून घेण्यात येतील. या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे.असे आवाहन लायन्स क्लब ऑफ मुरुड जंजिरा अध्यक्ष मकरंद कर्णिक यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या