मुरुड-जंजिरा,ता.८(नैनिता कर्णिक) मुरुडच्या सेवानिवृत्त संघटनेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त संघटनेतर्फे येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सेवानिवृत्त संघटना कार्यकारिणी सदस्य,जेष्ठ नागरिक समाज बांधव यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष नयन कर्णिक, उपाध्यक्ष शकील कडू सर, सचिव अनघा चौलकर जेष्ठ सदस्य रविद्र जंजिरकर, सदस्य बाळकृष्ण कासार, रमेश कवळे यांच्या हस्ते चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज व देवस्थान ट्रस्ट श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कार्यकारिणी सदस्या उषा खोत,सुगंधा दळवी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावा झाडे जगवा, वाचतील रानेवने तर फुलतील मानवी मने असे संदेश देऊन पर्यावरण दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.या वेळी विश्वस्त सुप्रिया मथुरे, समाज बांधव सुरेंद्र दिघे महात्मा फुले संस्था संचालक आदेश दांडेकर, विद्यार्थीनी आरा चौलकर उपस्थित होती वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार विरकुड,शैखर पाटील , उमेश शिगवण यांनी मोलाचे सहकार्य केले. नैनिता कर्णिक यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या