खारेपाटज,ता.६(महेंद्र म्हात्रे)अलिबाग तालुक्यातील वायशेत येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी राज्य सरचिटणीस राजू साळुंखे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची भव्य मूर्ती मंडळास भेट दिली.यावेळी व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना भाजप राज्य सरचिटणीस राजू साळुंखे म्हणाले कि, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भटके विमुक्त व धनगर समाजाला चांगले दिवस बघायला मिळत आहे व सामान्य माणसाला न्याय मिळत आहे.
याप्रसंगी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सर्व इतिहास सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनतेसाठी केलेली विकास कामे, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी दिवे, मंदिरांचा जीर्णोद्धार, शिवालय,तीर्थ धर्मशाळा, मठासाठी दान,गोदावरी घाट ,केशव कुंड असे उल्लेखनीय कार्य करणारा महाराष्ट्रातील लढवय्या नेत्या म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर होय असे राजू साळुंखे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल बोलताना सांगितले.
यादिवशी धनगर ओव्यांच्या भव्य कार्यक्रम व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभात महिलांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच वायशेत फाटा ते दत्त टेकडी मंदिर जीत नगर पर्यंत राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजन व दीपप्रज्वलन रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य मानसी दळवी यांनी केले तसेच भटके विमुक्त आघाडी राज्य भाजप राज्यचिटणीस राजू साळुंखे व थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स कंपनीचे महाव्यवस्थापक सुधीर कोळी,व्यवस्थापक संजीव हरलीकर, पीआरओ अधिकारी डॉ.कवळे,थळ सरपंच सुनील पत्रे,डीजीएम बॅगिंग प्लांट आरसीएफ संजय ठमके तसेच मुरुड तालुका भाजप अध्यक्ष शैलेश काते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व विविध पक्षांचे पदाधिकारी पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या