कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्समध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात विशेष योग सत्र आयोजित करण्यात आले होते.योग सत्राच्या प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर कॉलेज, अहिल्यानगर येथील वनस्पतिशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापिका व प्रमाणित योग प्रशिक्षक डॉ.निशा गोडसे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वत:साठी आणि समाजासाठी योग’ या संकल्पनेचे महत्त्व समजावून सांगत विविध योगासने प्रात्यक्षिकासह सादर केली. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्साहाने सहभागी होत मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योगाचा अवलंब कसा करावा, हे शिकून घेतले.तसेच महाविद्यालयात विविध स्पर्धा भित्तीपत्र बनवणे, घोषवाक्ये व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजन करण्यात आल्या.यावेळी महाविद्यालयातील सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. फिरोज शेख आणि आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे समन्वयक रहीम बागवान यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या