कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
यादिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने योगाची प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले तर योग प्रशिक्षक प्रमोद मसाल योगाचे महत्त्व सांगुन योग्य प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी प्राचार्य डॉ. जे.के. कांबळे,महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या