मुरुड,ता.२१(पांडुरंग आरेकर) मुरुडच्या जंजिरा विद्या मंडळ संचालित सर एस ए हायस्कूल व स्व.म.ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
हायस्कूलचे मुख्याध्यापक सरोज राणे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व पटवून दिले तर माजी क्रीडा शिक्षक व संचालक पांडुरंग आरेकर यांनी मार्निंग स्टारचे विद्यार्थी तसेच इयत्ता पाचवी ते अकरावी यांचे प्राणायम व योग आसने यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवून करण्यांत आले.योग दिनासाठी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. सृष्टीतील सर्वांत बुध्दीमान आणि प्रभावशाली निर्मिती म्हणजे मनुष्य! मनुष्याला स्वतः च्या शारिरीक भौतिक सुखामध्ये आनंद मिळवण्याची लागलेली असते .योग- प्राणायमाच्या नित्य साधनेमुळे केवळ शरिराचे आरोग्य संपन्न होते असे नाही तर मन सुद्धा निरोगी होते असे प्रतिपादन योग शिक्षक आरेकर यांनी केले.हा योग दिन साजरा करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहून योग दिन उत्साहात साजरा केला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या