कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर) अलिबाग -मुरुड व रोहा या तीन तालुक्याला जोडणारा दुवा असलेल्या साळाव पूलावरुन बारा टनांवरील वाहतुकीला संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी देण्यात आल्याने मुरुड आगारातून १६.२०० टन वजनाच्या नवीन गाड्या वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून मुरुडकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
मागील दोन तीन वर्षांपासून साळाव पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पुलावरून बारा टनांपर्यंत वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती.साळावपुलावरुन बारा टनांवरील वाहतुकीला परवानगी देण्यात यावी.याबाबत काही महिन्यांपासून येथील पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, विभाग नियंत्रक-पेण व मुरुड आगार प्रमुख यांजकडे सातत्याने पाठपुरावा करीत, विविध समस्या बाबत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. नुकत्याच मुरुड आगाराला पाच नवीन गाड्या मिळाल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बारा टनांवरील वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याने या पुलावरून,मुरुड आगारातील नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा झाल्याने मुरुडकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या