
मुरुडकरांची कित्येक वर्षाची नवीन गाड्यांची मागणी पूर्ण करताना मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सांगून पर्यटक, प्रवाशांचा प्रवास आनंददायी व सुखकर व्हावा. यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असून अलिकडे सव्वा आठ कोटी रुपये खर्च करून साळाव पुलाची दुरुस्ती झाली आहे. त्यामुळे नवीन बसेसला कार्यकारी अभियंता एम. एम धायतडक यांनी विभागीय नियंत्रकांना परवानगीचे पत्र दिल्याचेही सांगितले.
प्रत्येक डेपोला स्टाफ कमी आहे. त्याकरिता लवकरच मेगा भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. लवकरच रेवदंडा अलिबाग पुलावरून नवीन बसेस वाहतूक करतील. येणाऱ्या अधिवेशनात मुरुड आगाराचा विशेष उल्लेख करुन भरघोस निधी उपलब्ध करून देऊ. तसेच अन्य आगारां प्रमाणे मुरुडला देखिल सीएनजी पंप सुरु करू, असे आश्वासन दिले. आगार परिसराच्या सुशोभिकरणासाठी येत्या पुरवणी बजेटमध्ये निधीची मागणी करणार असल्याची आमदारांनी ग्वाही दिली.
जुन्या व मोडकळीस आलेल्या बसेसच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिक, चाकरमानी, विद्यार्थी आणि पर्यटकांना या नवीन बसेसच्या आगमनामुळे अधिक सुरक्षित, वेळबद्ध आणि आरामदायक प्रवासाचा मार्ग खुला झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या