कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर)आपली अनेक घरे असतील तर रिकामी ठेवण्याऐवजी ती भाड्याने देतो. त्या भाडोत्र्याने म्हणजे परदेशी नागरिकाने जर देश विरोधी कार्य केले अथवा करीत असेल तर त्याच्यावर व घर मालकावर कायदेशीर कारवाई होऊन शिक्षा व दंड होऊ शकतो, यासाठी आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात देऊन, वाढदिवसाच्या आधार कार्ड, रंगीत छायाचित्र, देऊन सुरक्षित रहा.असे अलिबाग तालुक्यातील गुंजीस ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत रायगड भूषण प्रा.डॉ. जयपाल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
ग्रामपंचायत सरपंच सदिच्छा पाटील,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा.डॉ.जयपाल पाटील,ग्रामविकास अधिकारी पूजा पाटील, रेखा म्हात्रे,तनिषा म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य,मुख्याध्यापिका श्रद्धा पाटील, पीएनपीच्या अस्मिता म्हात्रे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सरपंच सदिच्छा पाटील व ग्रामसेविका यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आपले घर संसार सांभाळताना महिलांना वेगवेगळ्या आपत्या समोर जावे लागते. त्यामुळे आर्थिक मानसिक नुकसान होते, यासाठी कोणकोणत्या सुरक्षा काळजा घ्याव्यात म्हणून ग्रामपंचायतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले आहे त्याचा लाभ आपण घेऊन ज्यांना आजच्या कार्यशाळेत यायला जमले नाही त्यांना सांगावे असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. यानंतर डॉ.जयपाल पाटील यांनी सर्वांसोबत संविधान वाचन केल्यानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या 112 क्रमांक आणि महिलांच्या बाळंतपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे 102 रुग्णवाहिकेसाठी व वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेत संपर्क साधला.
सध्याच्या काळात घरातील सर्वजण नोकरदार असल्याने एक घर गावाकडे दुसरे नोकरीच्या ठिकाणी तर मुला मुलींच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात घर घेतले जाते, काही वेळा तेथे कोणीही राहत नसल्याने घराची दुर्दशा होते यासाठी एजंटामार्फत आपण घर भाड्याने देतो, आपल्या सुरक्षेसाठी भाडे कराराची एक प्रत, त्याचे आधार कार्ड, एक रंगीत फोटो नजीकच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षका कडे अर्ज करून त्याची पोच घ्यावी, यामुळे भाडोत्री काही चुकीचं वागला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तरी पोलीस ठाण्यातून आपण केलेल्या अर्जाची पोहोच मुळे आपणावर गुन्हा दाखल होणार नाही, यामुळे तुम्ही सुरक्षित रहाल असे पोलिस हवालदार म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी कृषी खात्याचे कृषी सहाय्यक संतोष टकले यांनी खोडकिडा नारळ सुपारीवर येणाऱ्या किड रोगाबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश मांडवकर,प्रवीण लाखन,किरण म्हात्रे,संतोष पाटील,सचिन पाटील,कृणाल चव्हाण, निखिल नवाळे,मनीषा पाटील,आशा रजनी म्हात्रे, आशा कृतिका पाटील,आशा गीतांजली पडते, आशा नेहा पडते, अंगणवाडी सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले तर ग्रामसेविका पूजा पाटील यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या