कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर)आगरी समाजाचा असल्याचा मला अभिमान असून माझ्या आगरी समाजातून अनेक मुलामुलींनी चांगले आणि उच्च शिक्षण घेऊन नाव लौकिक मिळविलाआहे. अनेक जण सरकारी खात्यात उच्च पदावर विराजमान झाले आहेत.माझ्या आगरी समाजाच मी देण लागतो. माझ्या आगरी समाजासाठी मला भव्य सभागृह बांधायचे आहे, सरकार मध्ये असल्याने निधीची कमतरता पडू देणार नाही,सदैव समाजा असून व या पुढेही सदैव सोबत राहीन.असे प्रतिपादन अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी नांदगाव मजगांव पंचक्रोशी आगरी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी केले.
मुरुड तालुक्यातील विभागीय तप्पा सामाजिक संस्था उसरोली, नांदगाव मजगांव पंचक्रोशी आगरी समाजातर्फे अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी मान्यवरांच्या हस्ते शालेय गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उसरोली फाटा येथील पंचक्रोशी आगरी समाज सभागृहात संपन्न झाला.
विभागीय तप्पा सामाजिक संस्था अध्यक्ष शरद काबुकर, उपाध्यक्ष रमेश दिवेकर, शिक्षण मंडळ अध्यक्ष ॲड.विनायक शेडगे,उपाध्यक्ष यशवंत पाटील, सचिव नितेश भणगे,खजिनदार गणेश गाणार,महेंद्र पाटील माजी तप्पा उपाध्यक्ष नारायण पाके तसेच या बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष दत्तात्रेय नाक्ती, बक्षीस वितरक हरिभाऊ शेळके,कार्याध्यक्ष दामोदर राऊत, माजी सहसचिव बाळकृष्ण वाडकर,कार्याध्यक्ष मोतीराम म्हात्रे व शिक्षक बंधू उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या