कोर्लई,ता.१२(राजीव नेवासेकर) अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी नुकतीच मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथक उपकेंद्राची पाहाणी करुन समस्या जाणून घेतल्या.आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दुरावस्था पाहून त्यांनी नवीन इमारत बांधकाम होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, युवा सेना विभाग प्रमुख अविनाश शिंदे,कामगार सेना तालुका अध्यक्ष दिनेश मिणमिणे,बाबू सुर्वे, योगेश जयस्वाल, आविष्कार कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र दिवेकर, विशाल पाटील, अशोक पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल कंधारे, कर्मचारी वृंद,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या