कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर)आपल्या घरामध्ये जळण्यासाठी वापरत असलेला गॅस सिलिंडर म्हणजे एक प्रकारचा बॉम्ब असून स्वयंपाक घरात जेवणाच्या ओट्याखाली एक नाहीतर दोन सिलेंडर आपण ठेवतोच,मात्र त्याच्यासाठी वापरत असलेली रबरीनळी बनविणाऱ्या कंपनीने तिच्या वापराची मुदत छापलेली असते,आपण आपले कुटुंब शेजाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ती त्या तारखेलाच बदलावी.ज्यामुळे मोठा अनर्थ टळेल.असे अलिबाग तालुक्यातील परहुर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉ.जयपाल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
ग्रामपंचायतीचे प्रशासक शैलेश वर्तक, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्रा.डॉ.जयपाल पाटील, ग्रामविकास अधिकारी पूजा पाटील,तुकाराम सावणेकर, माजी सरपंच प्रशांत बागवे, कृषी सहाय्यक,अजित केणी ग्रामसेवक माणकोले मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
आपल्या रायगड जिल्ह्यावर अनेक आपत्या येतात अशावेळी नागरिकांनी कोण कोणती दक्षता घ्यावी. यासाठी आपल्या जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण डॉ. जयपाल पाटील यांचे 811 ग्रामपंचायत मध्ये आपत्ती कार्यशाळा सुरू असून याचा लाभ आपणही घेऊन आपल्या शेजाऱ्यांना सांगावे.असे प्रशासक शैलेश वर्तक यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ग्रामसेविका पूजा पाटील यांचे अभिनंदन केले.
महिलांच्या बाळंतपणासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा,यासाठी दूरध्वनी करता पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वाहन चालक स्वप्निल पाटील 102 चे वाहनचालक सोबत राही पाटील, अशोक कोरडे,सतीश कांबळे हे पोहोचून सुरक्षित बाळंतपणासाठी राही पाटील यांनी माहिती घेऊन सीपीआर कसा द्यावा.याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. उपस्थितांपैकी अंगणवाडी सेविका 3 आणि एक शिक्षिका यांच्याकडे वाहन परवाना नसताना सुद्धा त्या चालवतात हे चुकीचे असून वाहून कायद्याबद्दल रायगड पोलीस वाहतूक शाखेचे प्रशांत म्हात्रे यांनी नवीन वाहन कायदे व दंडाची माहिती दिली. शेतकऱ्यांना पीक, आंबे नारळ यांच्यावर येणाऱ्या रोगांच्या बाबत प्रकाश बागे कृषी सहाय्यक यांनी माहिती दिली त्याचबरोबर शासनाच्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांची माहिती बागाव कृषी विभाग यांनी दिली. जंगलामध्ये वणवा किंवा आग लागतात, वन खात्याला संपर्क करतात,आकांक्षा खांडव आणि कावेरी दराडे वनरक्षक हजर होऊन जंगलातल्या अगिन बाबत माहिती कावेरी दराडे यांनी दिली. यावेळी प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी बाळंतपणासाठी रुग्णवाहिकेत कसे न्यायचे याचे प्रात्यक्षिक चादरीमध्ये व हाताची घडी करून कसे न्यायचे याचे दाखविले, साप व विंचू दंशाच्या वेळी कोणती काळजी घ्यायची याची माहिती दिली, आपल्या घरातील गॅस सिलेंडर विकत घेताना तो मोजून घ्यावा, चुकून गॅस घराकडे झाला दारे खिडक्या उघड्या करून घरातील जेष्ठांना बाहेर काढावे व गॅस एजन्सीला संपर्क करावा असे सांगितले, घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या औषधांचे डबे वेगवेगळे ठेवावे, शेतावर मारणाऱ्या औषधांच्या बाटल्या पंप हाऊस मध्ये ठेवाव्यात, गावामध्ये पोलिसांची शूटिंग रेंज आहे, हा दिवस व दिनांक ग्रामपंचायतीने गावात दवंडी पिटवल्यावर कोणीही शूटिंग रेंजच्या परिसरात आपण व आपली गुरे घेऊन जाऊ नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी पोलीस पाटील गावडे,प्रणाली पाटील आणि वायरमन प्रभाकर ढसाळे, आशासेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महादेव पाटील तर ग्रामसेविका पूजा पाटील यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या