खारेपाट,ता.१(महेंद्र म्हात्रे)महाराष्ट्र राज्याचे बंदरे व मत्स्य विकासमंत्री नाम.नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल कोकणासह महाराष्ट्र राज्यातील कोळी बांधवांना मोठा दिलासा देऊन उल्लेखनीय कार्य केले आहे्असे मत भटक्या विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजू साळुंखे यांनी व्यक्त केले आहे.कोकणात रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांकडून या निर्णयाचे कौतुक होत आहे.
सन. 2012 मध्ये बंदरे व मत्स्य विकासमंत्री नारायण राणे यांनी विकासाला चालना दिली होती त्यांचाच वारसा मंत्री नितेश राणे यांनी घेतला असून महाराष्ट्र राज्यासाठी प्रगतीच्या दृष्टिकोनातून मोलाचे कार्य केले आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र सरकारचे ही मच्छिमार बांधवांच्या हितासाठी घेतलेला निर्णय उल्लेखनीय आहे महत्त्वाचे म्हणजे मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांचे जीवनमान आणखीन उंचावे.यासाठी मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रगतीच्या दृष्टिकोनातून उचललेला एक धाडसी पाऊल आहे असे मत राजू साळुंखे यांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या