कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर) मुरुड -अलिबाग रस्त्यावर परेश नाका दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय नजीक असलेल्या मोरीच्या आतील भागातील स्लॅबचा भाग कोसळत असून वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष तथा नऊगांव समाजाचे अध्यक्ष प्रवीण बैकर यांनी केली आहे.
मागील वर्षापासून या मोरीचा स्लॅबची दुरावस्था असून दोन तीन दिवस मुरुडमध्ये जोरदार वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे, सातत्याने अवजड वाहनांच्या वर्दळीने मोरीचा स्लॅबचा भाग कोसळत आहे. मुरुड जंजिरा पर्यटनात दैनंदिन जीवनात या रस्त्यावर वाहनांची सातत्याने वर्दळ असते.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर सदरच्या मोरीचा भाग कोसळून अपघाताची शक्यता लक्षात घेऊन संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी प्रवीण बैकर यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या