खारेपाट,ता.१( महेंद्र म्हात्रे)उरण येथील स्पीडी सीएफएस कंपनीमधील कामगारांच्या मागण्या कंपनी व्यवस्थापकांनी सोडवाव्यात.अशी मागणी राष्ट्रीय कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली आहे.
सदर कंपनी कामगारांच्या मागील वेतन करारातील प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याकरिता स्पीडी सीएफएस कंपनीमधील युनियन प्रतिनिधी यांच्या समावेत कामगार नेते महेंद्र घरत उपस्थित होते.
स्पीडी सीएफएस मधील कामगारांच्या मागील वेतन करारातील प्रलंबित मागण्या त्वरित सोडवाव्यात या करीता स्पीडी सीएफएस मधील युनियन प्रतिनिधींनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या सहकार्याने जेएनपीटी चेअरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले व लवकरच याबाबत मिटिंग आयोजित करून कामगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील.असे आश्वासन चेअरमन यांनी यावेळी दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या