कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) लायन्स क्लब ऑफ श्रीबाग व आदिवासी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भाल येथील खासगी शाळेत डिस्ट्रिक्ट क्लबचे पदाधिकारी एफ.जे.एफ.गणात्रा व ॲड.डॉ.के.डी.पाटील यांच्या सहकार्यातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
लायन्स क्लब ऑफ श्रीबागचे अध्यक्ष ॲड.डॉ.के.डी. पाटील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या ,पेन, दफ्तर इ.शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव व खजिनदार दत्तात्रय माळवी, संस्था समिती सदस्य जगदीश पाटील, रिजन चेअरपर्सन विजय वनगे,ॲड.विक्रांत पाटील,डॉ.संदीप वारगे, लायन घोसाळकर,लायन गायकवाड,लायन पैठणकर तसेच अलिबाग विकास संस्थेचे अध्यक्ष जानू शिद मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेश्मा वारगे यांनी तर मुख्याध्यापक गुलाब काळे व शिक्षिका वर्षा माळवी यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या