कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)संपूर्ण जगभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर नेल्याने खरे आणि गोड बोलणारे शत्रू फार झाले असल्याने आपल्या देशात अतिरेकी कारवाया होऊ लागल्या आहेत, यामध्ये जमिनी वरून आकाशातून व पाण्यातून विकसित झालेली शस्त्रांमुळे कधीही कुठेही आपत्ती येऊ शकते, यासाठी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला आपण व आपले कुटुंब सुरक्षित कसे राहतील याचा अभ्यास असणे गरजेचे आहे, याबाबत 14 जुलै २०२३ रोजी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा अध्यक्ष आपत्ती प्राधिकरण भारत सरकार नवी दिल्ली यांस पाकिस्तान बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या पासून आपल्या देशाला धोका जाणवतो असे मला वाटते. यामध्ये वरील देशांनी न्यूक्लिअर बॉम्ब चा वापर केल्याने तर देशावर मोठ्या प्रमाणात आपत्ती येऊ शकते यासाठी जनतेसाठी महत्त्वाच्या देशातील शहरान बाहेर बंकर बांधावेत व इयत्ता दहावी ते पुढील वर्गासाठी एनसीसी व नागरी संरक्षण दलाचे शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी केली होती, ती सध्या अमलात आली आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे. त्यानुसार हे प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे नागरी संरक्षण दल हे प्रमुख ठिकाण आहे. कारण रायगड जिल्ह्याच्या नागरी संरक्षण दलाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून मी शाळा महाविद्यालय, पोलीस सरकारी नोकर यांच्यामध्ये प्रसिद्धीचे काम केलेले आहे.याविषयी सध्याच्या आपत्कालीन परिस्थिती साठी लक्षात घेता आणि युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता मॉक ड्रिल, ब्लॅक आउट इत्यादी नागरी संरक्षण सुविधा, उपाय योजना राबविण्यासाठी माजी एनसीसी कॅडेट, एनसीएस, एन वाय के एस, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी, तसेच खाजगी सुरक्षा रक्षक नागरिक, यांना नागरी संरक्षण दलाचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी करावी असे आदेश वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्री.पा.रा. सांगडे यांनीमहाराष्ट्र शासन गृह विभाग नागरी संरक्षण संचालनालय ६/५ स्वयंसेवक २०२५/५०० दिनांक१० मे 2025 रोजीचे, अतिरिक्त नियंत्रक बृहन्मुंबई, उपनियंत्र क्षेत्र १,२,३,४ बृहन्मुंबई, उपनियंत्रक नागरी संरक्षण, ठाणे, पुणे, नाशिक, उरण- रायगड, तारापूर- पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना दिले आहेत. यासाठी नागरी संरक्षण दला मध्ये ऑनलाईन नोंदणी करावी. याबाबतचा अहवाल दररोज महाराष्ट्राचे आपदा प्राधिकरण प्रमुख, तथा मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले नेहरू युवा केंद्र हे जुने नाव असून सध्याचे माय भारत(nyks) नाव हे असून येथे जिल्ह्यातील युवक व युवतींना ३ तीन दिवसाचे प्रशिक्षण(२८ मार्च २०२५ ते ३१ मार्च 2025 पर्यंत ७ दिवसाचे निवासी शिबिर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात देण्यात येणार होते, आणि आता सुरुवात झाली आहे. ही आपदामित्र योजना राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापना तर्फे देण्यात येणार असून येथे नागरी संरक्षण दलाचे अधिकारी, एनडीआरएफ चे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. आपत्ती कधी कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही, यासाठी सुरक्षेचे ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे, ज्यांनी देशभरात दोन लाखाहून अधिक नागरिकांना प्रशिक्षण दिले आहे असे आवाहन जागतिक पातळीवर पोहोचलेले आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, प्रशिक्षक प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या