कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालय,उरण येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ जून ते २३ जून २०२५ या कालावधित आयपीआर आणि केमोइन्फॉरमॅटिक्स यावर चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ई-कार्यशाळेचे उद्दिष्ट शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आयपीआर आणि केमोइन्फॉरमॅटिक्स विषयी सविस्तर ज्ञान मिलावे. संशोधन कार्य करताना ते या विषयातील विविध पैलूंचा वापर करू शकतात.या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ.साजिद शेख,प्र.प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेची प्रस्तावना प्रा. तमसील शहाजहान व डॉ. गुरुमीत वाधवा यानी केली तसेच उद्घाटन समयी डॉ. आमोद ठक्कर, डॉ अनिल पालवे व डॉ. साजिद शेख यानी आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेमध्ये ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या