कोर्लई,ता.२८(राजीव नेवासेकर)कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुरुड शाखेतर्फे अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या निवासस्थानी महाकवी कालिदासदिन संपन्न झाला.
सुरुवातीला अध्यक्ष संजय गुंजाळ,उपाध्यक्षा उषा खोत,कार्याध्यक्ष अरूण बागडे,जेष्ठ शास्त्रीय संगीत गायक डाॅ.रविंद्र नामजोशी,प्रतिभा मोहिले,पांडुरंग आरेकर,उर्मिला नामजोशी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीगणेश पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात आली.यावेळी सर्व उपस्थितांचे चाफ्याची फुले देऊन स्वागत करण्यात आले.
डाॅक्टर नामजोशी यांनी संस्कृत श्लोक म्हणून त्याचा मतितार्थ सांगितला तसेच काही बंदिशी व पावसावरची गीते सादर करून मैफिलीची सुरेल रंग भरला !यानंतर दिपाली दिवेकर, वासंती उमरोटकर, प्रतिभा मोहिले, प्रतिभा जोशी, अरुण बागडे,शकुंतला रोटकर, लक्ष्मण ठाकूर, संजय गुंजाळ, मनीष माळी, आशिष पाटील, उषा खोत, सिद्धेश लखमदे यांनी पावसावरच्या कविता, गाणी तसेच कालिदास यांच्याबद्दल माहिती कथन केली.सुत्रसंचालन उषा खोत यांनी तर सिद्धेश लखमदे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या