कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर)गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात साळाव-मुरुड रस्त्यावर विविध ठिकाणी असलेली उनाडगुरे वाहन चालकांची डोकेदुखी ठरत असून अपघाता नंतरच शासन-प्रशासन जागे होणार काय ? असा सवाल विचारला जात आहे.
साळाव-मुरुड रस्त्यावर बोर्ली, ताराबंदर, बारशिव, काशिद, नांदगांव,मजगांव-पूल तसेच विहुर आदी. भागात रस्त्यांवर उनाड गुरांचा हैदोस असून रस्त्यावर,पुलावर असलेल्या ठिय्या मुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे
या पूर्वी ग्रामपंचायतीत असलेली कोंडवाडा हि संकल्पना संपुष्टात आल्यामुळे व संबंधित गुरांच्या मालकांचे दुर्लक्ष यामुळे रस्त्यावरील उनाड गुरें वाहन चालकांची डोकेदुखी ठरत असून यावर तातडीने ठोस उपाय योजना होणे अत्यंत गरजेचे असून काळाची गरज बनली आहे. यावर तातडीने कोणती उपाय योजना न झाल्यास कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्यावरील उनाड गुरांचा प्रश्न मागील आमसंभा मघ्ये उपस्थित करण्यात आला होता परंतु त्यावर अद्याप कोणती उपाय योजना होऊ शकली नाही.
संबंधित ग्रामपंचायत, शासन व प्रशासनाने याप्रश्नी तातडीने लक्ष पुरवून,ठोस निर्णय घेऊन रस्त्यावरील उनाड गुरांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा. अशी मागणी वाहन चालक व प्रवासी वर्गातून जोर धरीत आहे.
---------------------------------
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या