Type Here to Get Search Results !

म्हसळा येथे कोकण एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनतर्फे वृक्षारोपण


कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर)कोकण एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनतर्फे  मस्जिद-मदरसाच्या लगतच्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. 

     मुस्लिम समाजातील जमाअतुल मुस्लिमीन मस्जिद व परिसरातील मोठमोठे लोक सहभागी झाले होते. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आंबा,काजू आदी.झाडांची रोपे लाऊन वृक्षारोपण करण्यात आले.    

           यावेळी डॉ. सुफ़ियान यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्राणवायूच्या आवश्यकतेसाठी वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे, यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

     या उपक्रमाबद्दल जमाअतुल मुस्लिमीन मस्जिद व मुस्लिम समाजातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आणि मदरशा आणि परिसरातील दोन्ही डोंगरावर कोकण एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनकडून वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला आहे, जो आपल्या निसर्गसंपत्तीच्या जतनासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर