Type Here to Get Search Results !

अशिलकुमार ठाकूर घेणार पक्षबदलाचा निर्णय : कोणता झेंडा घेणार हाती ? मुरुडमध्ये याचीच चर्चा



कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर) मुरुडमध्ये १९८६ साली शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून कट्टर शिवसैनिक पक्षात विविध पदे भुषविलेले,ज्यांची उपतालुकाप्रमुख पदी तोंडी निवड करण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात आले नाही, पक्षात खच्चीकरण होत असल्याने गेले दोन वर्षे राजकारणापासून अलिप्त असलेले व्यक्तिमत्त्व अशिलकुमार ठाकूर लवकरच पक्ष बदलाचा निर्णय घेणार असल्याचे समजते.

   तालुक्यात १९८६ साली शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून ते कट्टर शिवसैनिक परिचित आहेत,त्यांचे वडीलांनी सन.२००१ मध्ये पक्षातर्फे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक लढविली होती.अशिलकुमार ठाकूर यांनी मुरुड मुरुड शहर गटप्रमुख,सन.२०१० उपशहरप्रमुख,सन.२०१७ ते सन.२०२२ दरम्यान शहरप्रमुख पदी उत्तम प्रकारे काम करुन उपतालुकाप्रमुख पदी तोंडी निवड करण्यात आली होती.सन २०१९ दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्रशेठ दळवी यांना तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यात योगदान दिले होते.मात्र दोन वर्षे होऊनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात उपतालुकाप्रमुख पदी तोंडी निवड करण्यात येऊन तसे नियुक्ती पत्र देण्यात आले नाही.पक्षातील गटबाजी,कामे करण्यात येणाऱ्या अडचणी आणि खच्चीकरणामुळे अखेरीस कंटाळून गेली दोन वर्षे राजकारणापासून दूर राहिलेले अशिलकुमार ठाकूर यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला असून कोणता झेंडा घेणार हाती ? याचीच चर्चा जनमानसातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर