कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर)सात जन्मी हाच नवरा मिळो अशी प्रार्थना करीत मुरुड तालुक्यात ठिकठिकाणी बहुसंख्य सुवासिनींनी वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
भारतीय संस्कृतीत वडाचे झाड पूजनीय मानले जाते. वटवृक्षाची विवाहित स्त्रिया हळदी, कुंकू, अक्षता, पुष्प, नैवेद्य दाखवून पूजा करीत,वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून सुवासिनी सात प्रदक्षिणा घालून सात जन्मी हाच पती मला लाभो आणि त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करीत मुरुड तालुक्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या