कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागीय वाहतूक शाखेच्या अधिक्षक मनीषा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड आगारात राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा.वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आपला ७७ वा वर्धापन दिन 1 जून रोजी सर्व बसस्थानकांवर मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. हा दिवस 1948 मध्ये जेव्हा पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली ST बस धावली, तो दिवस दरवर्षी स्मरणात ठेवला जाणारा सुवर्ण क्षण आहे.
मुरुड वाहतूक नियंत्रण कक्षात वर्धापन दिनानिमित्त आकर्षक रांगोळी व सजावट करण्यात आली होती.यावेळी मान्यवर, उपस्थित प्रवाशांना गुलाब देऊन व प्रवाशांच्या हस्ते केक कापून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
पेण येथील रायगड विभागीय वाहतूक शाखेच्या अधिक्षक मनीषा पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक कृष्णा म्हात्रे, सुनील हासे, संदीप सानप, मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक संजय भोकरे,चालक,वाहक व सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या