कोर्लई,ता.३१(राजीव नेवासेकर) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुरुड आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक गौतम लक्ष्मण भोसले आपली ३१ वर्षाची सेवा उत्तम प्रकारे करुन सेवानिवृत्त झाले.आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
गौतम भोसले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड जिल्ह्यातील महाड आगारात दि.२० एप्रिल १९९४ रोजी चालक पदावर सेवेत रुजू झाले.सन.२००७ मध्ये अलिबाग आगारात चालक पदावर, त्यानंतर सन.२०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाच्या प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षक म्हणून काम केले व
दि.२० डिसेंबर २०१६ रोजी मुरुड आगारात सहायक वाहतूक निरीक्षक पदावर उत्तम प्रकारे सेवा करुन दि.३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले.
मुरुड आगारात आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत,मार्गदर्शनाखाली राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुरुड आगार,कर्मचाऱ्यांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सेवापुर्ती सोहळ्यात गौतम भोसले यांचा श्रीगणेश प्रतिमा,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आगार प्रमुख राहुल शिंदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक संजय भोकरे, गौतम भोसले यांचे कुटुंबीय,पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार रितेश यादव, किरण कांबळे,चालक वाहक, सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या