Type Here to Get Search Results !

करंजाडे - मुखरीचीवाडीचे अदिवासी घरकुल योजनेपासून वंचित

 

कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर) पनवेल तालुक्यातील करंजाडे -मुखरीचीवाडीत पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेला आदिवासी बांधव अद्यापही घरकुल योजनेपासून वंचित असून समाजावर होणा-या अन्यायाबाबत आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष जानू शिद यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात येऊन मागणी करण्यात आली आहे.यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके (सामान्य प्रशासन) यांनी निवेदन स्वीकारले.

    त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,पनवेल तालुक्यातील करंजाडे-मुखरीचीवाडी करंजाडे सेक्टर ३ येथे आदिवासी समाज पिढ्यानपिढ्यापासून वास्तव्यास असून सदर जागेवर या समाजाची राहती घरे कुडा मातीची आहेत लहान मुले, वृद्ध या घरात अतिशय भितीयुक्त वातावरणात राहत आहे, या भागामध्ये ग्रामपंचायत करंजाडे घरकुल योजना राबवण्यास टाळाटाळ करत असल्याने परिणामी यावाडीतील अदिवासी बाधवाना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. त्याच प्रमाणे मुखरीचीवाडी सेक्टर ३ येथील अदिवासी समाजाला या भागातून हुसकाऊन लावून विस्थापित करण्याचा डाव सुरु आहे. अदिवासी समाज पिढ्यानपिढ्या या जागेवरील मूळनिवासी असताना स्थानिक प्रशासन व सिडको प्रशासन अदिवासी समाजाला या भागातून बाहेर काढण्यासाठी दबाव टाकत आहे व "सदर जागा सिडकोची आहे व तुम्ही अतिक्रमण करुन याठिकाणी राहत आहात असे सांगत आहेत.सदर बाब या सर्व मूळनिवासी अदिवासी समाजावर अन्याय कारक असून त्यांना न्याय मिळणे आवश्यक व गरजेचे आहे.

   गेल्या कित्येक पिढ्या सदर अदिवासी समाज या गावात राहत असून त्यांची जीवनशैली,त्यांचे जीवनमान याच गावाशी निगडीत आहे,त्यांचा व्यवसाय रोजगार देखिल याच गावाशी निगडीत आहे.असे असताना या समाजाला या गावातून विस्थापित करणे व त्रास देणे अन्यायकारक आहे, अदिवासी समाजाला त्रास देणे ही अनुचित मानवी प्रथा मानली जाते. भारतीय संविधानाने सर्वाना समान न्याय व संधीची तरतूद केली आहे,आदिवासींना त्रास देणे भारतीय संविधानाच्या विधायक तरतूदिला विपरीत आहे.मानवधिकाराचा विचार करुन करंजाडे- मुखरीची वाडी सेक्टर ३ येथील अदिवासींना न्याय मिळवून द्यावा व त्याच ठिकाणी त्यांचा विकास व पुनर्वसन करण्यात यावे.असे आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जानू शिद, कायदेशीर सल्लागार ॲड.के.डी.पाटील, ॲड.विक्रांत पाटील, मार्गदर्शक डॉ.संदीप वारगे, गणेश कातकरी, दिलिप कातकरी, मंगेश महाजन, ओमकार पेडणेकर, सविता कातकरी, कमला वाघे,गौरी वाघे, आशा कातकरी, गिरीजा वाघे, संगीता वाघे, आशा वाघे, वनिता मुकणे, सिद्धेश पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर