कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर)मे महिन्यात उन्हाच्या काहिली नंतर पहिल्या आठवड्यात हवामानात बदल होऊन मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे मुरुडमध्ये नागरिकांची एकच तारांबळ उडाली, अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले.आतापर्यंत १२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवार व गुरुवारी सकाळी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील फळभाजी,आंबा काजू यावर परिणाम झाला असून आंबा बागायतदार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे तर काही ठिकाणी कच्च्या वीटा भिजून वीटभट्टी व्यवसाावर परिणाम झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या