Type Here to Get Search Results !

मुरुडमध्ये खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा

  

कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर)महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये शासनाच्या कृषी विभागातर्फे दि.५ में दि.६जून २०२५ या कालावधीत खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून त्याचाच भाग दि.५ मे रोजी मुरुडच्या पंचायत समिती सभागृहात  खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते

    जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील  कृषी उपसंचालक  प्रविण ठिगळे, तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ,मुरुड तालुक्यातील शेतकरी , शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष , मंडळ कृषी अधिकारी  प्रमोद नरळे , कृषी पर्यवेक्षक रविंद्र सैंदाणे  व कृषी विभागातील इतर सर्व कृषी सहाय्यक तसेच पंचायत समिती मधील कृषी विस्तार अधिकारी राखी खोपकर यावेळी उपस्थित होत्या. 

         खरीप हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने भात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, चारसुत्री पद्धतीने भात लागवड,गटशेतीचे फायदे,भात बीजप्रक्रिया व त्याचे महत्त्व,सेंद्रीय शेतीचे महत्व तसेच कमी पाण्यामध्ये फळबागेचे पाणी व्यवस्थापन करण्याविषयी  CRA ( Climate Resilient Agriculture) तंत्रज्ञान इ विषयांवर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पाणी फाऊंडेशन चे प्रमुख सदस्य सुभाष पोळ यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना video conference व्दारा शेतकऱ्यांनी एकत्र येवून गटामार्फत शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होवू शकतो व पर्यायी उत्पन्न वाढण्यास मदत होवू शकते तसेच पाणी फाऊंडेशन व्दारे चालवल्या जाणाऱ्या digital शेतीशाळा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केे तर  कार्यकम प्रमुख अध्यक्ष कृषी उपसंचालक प्रवीण ठिगळे यांनी कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे तसेच डिजीटल शेतीशाळेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर