पक्ष संघटनेसाठी बैठक अतिशय महत्वाची असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक यांनी केले आहे.
मजगांवमध्ये कॉग्रेस कमिटीची बैठक दि.४ मे रोजी
मे ०३, २०२५
0
कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर)महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार मुरुड तालुका कॉंग्रेस कमिटी अंर्तगत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आढावा बैठक प्रदेश निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलींद पाडगावकर व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ०४ मे, २०२५ रोजी दुपारी ठीक ३. ०० वा. मजगांव येथील मुस्लीम समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या