कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर)अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भाल प्राथमिक शाळेचा प्रज्ञावंत विद्यार्थी रुद्र राजाराम पवार (इ. ५वी) याने शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत ६१.५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवून केंद्रशासनाच्या माणगाव -निजामपूर येथील नवोदय विद्यालय निवासी शाळेत प्रवेश स्पर्धा परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल व दर्जेदार शैक्षणिक व्हीडीओ उपक्रमात जिल्हा परिषद शाळांमध्ये जिल्ह्यात शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा वारगे यांनी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संचालक तथा माजी जिल्हा सरकारी वकील अॕड.प्रसाद पाटील,संचालिका सुषमा सोमण,कु.रुद्रची आई सरिता वडील राजाराम पवार, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक विजय नांदगावकर(भोवाळे),शिवाजी दराडे(उसर), मुख्याध्यापक गुलाब काळे(कार्ले),साधना पाटील(पवेळे),स्नेहा पाटील(वढाव ),प्रतिभा पाटील(लोणारे),रेश्मा वारगे(भाल), शिशुविहार कल्याणी वेखंडे(शिशु विहार),सिताराम जाधव(जांभूळपाडा), सहायक शिक्षक समीर पाटील, मंगेश आपणकर,रुपा केणी, जागृती पाटील, मनिषा धसाडे,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक द.ल.माळवी यांनी तर विलास पनासे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या