कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)मराठी भाषा संवर्धन ,मराठी साहित्य प्रचार आणि प्रसार या हेतूने स्थापन झालेल्या साहित्यसंपदा संस्थेतर्फे मराठी संवर्धन ,प्रचार प्रसार यांसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांचा सन्मान "साहित्यसंपदा दीपस्तंभ " पुरस्काराने करण्यात येतो. १ मे रोजी महाराष्ट्र दिन व मराठी भाषा दिनाचे औचित्यसाधून साहित्यसंपदातर्फे २०२५ सालच्या साहित्यसंपदेचा सन्मानाचा " मराठी दीपस्तंभ " पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुरुड शाखेला सन्मान पत्र ,शाल श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला.
सातत्याने रायगड मधील मुरुड विभागात साहित्यिक चळवळ राबविणारी आणि लिहिती नवी पिढी उभारणारी 'कोकण मराठी साहित्य परिषद (मुरुड शाखा )', अनेक साहित्यिक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित आहेत. साहित्यसंपदातर्फे राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ गझलकार ए. के. शेख, कोमसाप जनसंपर्क प्रमुख एल. बी. पाटील सर, कवी लेखक रमेश धनावडे, साहित्यसंपदा संस्थेचे संस्थापक वैभव धनावडे, नागेश कुलकर्णी, गझलकार रोहिदास पोटे, गझलकार सुभाष कटकदौंड आदी मान्यवर उपस्थित होते.
कोमसाप मुरुड जंजिरा शाखेतर्फे पुरस्कार स्वीकारण्यास शाखाध्यक्ष संजय गुंजाळ तसेच शाखेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन आदर्श पतसंस्था अलिबाग येथील सभागृहात करण्यात आले होते.या पुरस्काराबद्दल कोमसाप मुरुड शाखेचे अनेक मान्यवरांतर्फे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या