खारेपाट -८ (महेंद्र म्हात्रे) पेण तालुक्यातील डोलवी येथील स्वर्गीय बालाजी शेठ म्हात्रे माजी सभापती पेन यांचे पुतणे व डोलवी ग्रामपंचायत सरपंच परशुराम म्हात्रे व पंचायत समिती सदस्य पेन प्रदीप म्हात्रे यांचे वडील तसेच रायगड जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती सुरेश म्हात्रे यांचे काका स्वर्गीय मधुशेठ म्हात्रे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचे अल्पशा आजाराने दिनांक 6 मे 2025 रोजी वयाच्या 68 यावर्षी मृत्यू झाला त्यांच्या अंत्ययात्रेला आमदार रवीशेठ पाटील यांचा संपूर्ण परिवार रायगड जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव एड प्रवीण ठाकूर माजी पंचायत समिती सभापती अलिबाग बाळू शेठ पाटील व रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नेतेमंडळी तसेच जे एस डब्ल्यू कंपनीचे अधिकारी राजेश कुमार रॉय प्यारो आत्माराम बेतकेकर कुमार थत्ते इतर अधिकारी तसेच पेण येथील नायब तहसीलदार नितीन परदेशी जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक राजू पिचिका व अलिबाग पेन वडखल व रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी व मोठा जनसमुदाय आप्तेष्ट मंडळी व समस्त म्हात्रे परिवार उपस्थित होता यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते मधुशेठ म्हात्रे यांना पुष्प माळा घालून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली
महत्वाचे म्हणजे स्वर्गीय मधुशेठ म्हात्रे यांनी युवकांचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता व्यायामशाळा उभारली तसेच त्यांना पूर्वीपासून धार्मिक कार्याचे आवड होती ते श्री विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांचे परंपरा होते आणि म्हणूनच पंढरपूर शिर्डी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या भाविकांच्या दिंड्या त्यांच्या निवास त्यांना जवळून जात होत्या तेव्हा त्यांचा स्वागत करून दिंडीतील भाविकांना अल्पहार व आर्थिक मदत करत होते तसेच जे एस डब्ल्यू येथे स्थानिकांना रोजगार मिळावा त्यासाठी त्यांचे योगदान होते व पाबळ खोऱ्यातील नागरिकांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला मदत करत होते विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाची त्यांच्या कुटुंबातील तिसरी व चौथी पिढी आजही कार्यरत आहे महत्वाचे म्हणजे सदर परिसरातील जनतेला न्याय हक्क देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते मधुशेठ म्हात्रे यांचे वडील नारायण म्हात्रे यांचा वारसा आजही मात्रे परिवार धार्मिक कार्यासाठी झटत आहे त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी असा परिवार आहे स्वर्गीय मधुशेठ म्हात्रे यांचा मूळचा व्यवसाय पोल्ट्री व्यवसाय या व्यवसायातून अनेक गरजूंना रोजी रोटी निर्माण करून दिली तसेच बारा दिवस भागवताची कथा शिवचरित्र यांचे वाचन करण्यास येणार आहे तसेच उत्तर कार्याच्या दिवशी ह भ प गोपाळ महाराज चिंधणकर यांचे सुश्राव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या