कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)महाराष्ट्र राज्यातील बेघर वृद्ध आर्थिक दृष्ट्या दुर्बल लहान मुले आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांना उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी तातडीने मदत करण्याचे निर्देश राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने राज्याच्या सचिवांना दिले असल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांनी आभार मानले आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण तर्फे आजारांवर उपचार, सार्वजनिक ठिकाणी पंखे, पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, कामगारां साठी संरक्षक कपडे, विश्रांतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तिच्या नात्यांचा धोका नागरिकांना असल्याने या मदतीमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल, बेघर आणि उघड्यावर काम करणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे, याबद्दल राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांचे हार्दिक अभिनंदन आणि उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांनी दु.12-00 ते दु.3-00 वाजेपर्यंत उन्हात घराबाहेर न पडण्याची काळजी घ्यावी.असे आवाहन डॉ. जयपाल पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या