Type Here to Get Search Results !

डोंगरी सुभा भंडारी चषकाचा मानकरी ठरला कर्जतचा आर्यन स्पोर्ट्स शेलू कब्बडी संघ !



कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर) मुरुड जंजिरा येथील डोंगरी सुभा येथे ग्रामस्थ डोंगरी सुभा संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भंडारी चषक कब्बडी स्पर्धेत कर्जतच्या आर्यन स्पोर्ट्स शेलू कब्बडी संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे ! विखुरलेला भंडारी समाज एकत्र यावा.यासाठी दर तीन वर्षांनी डोंगरी सुभा येथे  जिल्हा स्तरीय कब्बडी चषक स्पर्धांचे आयोजन केले जाते.चषकाचे हे दुसरे पर्व होते.

    नागांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदू मयेकर, रेवदंडा -चौल हितवर्धक मंडळ अध्यक्ष सुरेश खोत,सचिन कदम, अलिबाग भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दर्शन पारकर, रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य संदिप खोत,मुरुड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, तृप्ती पाटील,मेघाली पाटील,पोलीस उपनिरीक्षक दिपक राऊळ, सिद्धेश गायकर,मृदास तोंडलेकर,अमोल भोसले, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य जनार्दन पाटील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

  सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन नंदू मयेकर व सुरेश खोत यांच्याहस्ते दीपप्रज्वलन, श्रीगणेश व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर कब्बडी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

   या जिल्हा स्तरीय कब्बडी स्पर्धेत कर्जत येथील आर्यन स्पोर्ट्स शेलू आकाश कोंडीलकर कब्बडी संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर मुरुड तालुक्यातील खारिकवाडा येथील वादळ कब्बडी संघाने द्वितीय,रोहा -वाशी येथील गणेश कब्बडी संघाने तृतीय व नागाव -बंदर  दर्यावर्दी कब्बडी संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू कर्जत संघाच्या आकाश याला मिळाले तर उत्कृष्ट चढाई खारिकवाडा येथील ओमकार मिस्त्री, उत्कृष्ट पकड रोहा वाशी येथील प्रचित रटाटे, बेस्ट इमर्जिन प्लेअर अनिरुद्ध भोसले आणि नागाव -बंदर येथील मंथन सुर्वे  पब्लिक हिरो ठरला ! प्रास्ताविक मानसी नाईक,सुत्रसंचलन उषा खोत तर सागर राऊत यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ डोंगरी सुभा अध्यक्ष मच्छिंद्रनाथ नाईक, उपाध्यक्ष मंगेश पुलेकर, सचिव संजय भोसले,सचीन नाईक, राजेश सतविडकर,जय हनुमान क्रीडा मंडळ सदस्य भूषण भोसले,शुभम भोसले, चेतन खेऊर, सिद्धेश नाईक,नयन सतविडकर, नरेंद्र सतविडकर,प्रयाग भोसले, यांनी विशेष परिश्रम घेतले.

________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर