खारेपाट,ता.१६(महेंद्र म्हात्रे) राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे राज्य चिटणीस राजू साळुंखे (भटके विमुक्त आघाडी) यांनी खासदार धैर्यशील पाटील यांची दक्षिण रायगड भाजप जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना व्यक्त केले.
यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही अभिनंदन केले तसेच रायगड जिल्ह्यातील तळागाळातील जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.असा विश्वास राजू साळुंखे यांनी व्यक्त केला तसेच मुरुड तालुका भाजप अध्यक्ष शैलेश काते यांनीही खासदार धैर्यशील पाटील यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी अलिबाग मुरुड परिसरातील पदाधिकारी नरेश वारगे,धनेश गोगर,अनिल नांदगावकर,हरेश आरकशे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद कोंडे,महेश ठाकूर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या