कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवामानात बदल होऊन अवकाळी पाऊस पडला.गेल्या दोन दिवसांत प्रचंड उष्मा वाढला,जिवाची घालमेल होत होती.उकाड्यानंतर मुरुडसह सकाळी पावसाने नांदगाव,मजगांव,बोर्ली -मांडला, आगरदांडा परीसरात हजेरी लावली.
यंदा मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बागायतदार यांच्या चिंतेत वाढ झाली असून याचा फळ भाजीपाला व आंबा काजू पिकावर तसेच वीटभट्टी व्यवसायावर परिणाम झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या शक्ती या चक्री वादळाने वा-याची दिशा बदलल्याने कमी अधिक प्रमाणात याचा परिणाम राज्यातील हवामानावर होताना दिसत असून पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेश येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर कोकणात मुंबईसह रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा परिणाम दिसून येत आहे.
मागील आठवड्यात अचानक पडलेल्या अवकाळी पावसानंतर हवामानात चढ उतार दिसून येत होता.प्रचंड उकाड्यानंतर मुरुडसह तालुक्यातील नांदगाव मजगांव बोर्ली -मांडला आगरदांडा परीसरात सकाळी पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली नंतर दुपारच्या वेळी ढगाळ व उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाल्याचे चित्र दिसून येत होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या