Type Here to Get Search Results !

मुरुडच्या सर एस ए हायस्कूलचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

 

मुरुड,ता.३०(पांडुरंग आरेकर) मुरुडच्या जंजिरा विद्या मंडळ संचलित सर एस ए हायस्कूल व स्व.म.ल.दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५चा इ.१० वी मधील यशस्वी विद्यार्थांचा गुण गौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव चंद्रकांत अपराध ,संचालक प्रमोद भायदे ,पांडुरंग आरेकर,उदय दांडेकर,विजय वाणी, ग्रंथपाल उल्हास गुंजाळ, मुख्याध्यापक सरोज राणे, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व यशस्वी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

    सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन मुख्याध्यापक राणे यांनी प्रास्ताविकात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा देत ऑन लाईन प्रवेश फॉर्म भरण्या संदर्भात रजिस्ट्रेशन करण्यासाठी माहिती मिळाल्यास शाळेशी संपर्क साधण्याचे अवाहन केले. जेणेकरून प्रवेश प्रकीयेसाठी कोणतीही अडचणनिर्माण होऊ नये सहकार्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले .               

यावेळी प्रमोद भायदे,उदय दांडेकर व पांडुरंग आरेकर या संचालकांनी शाळेत शिक्षक संख्याकमी असून देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मेहनत करून यश मिळवून दिले असून भविष्यासाठी योग्य क्षेत्र निवडण्याचे आवाहन  केले. शाळेच्या परंपरा नुसार शाळेचा नाव लौकीक केल्याबद्दल धन्यवाद दिले असून अनुक्रमे प्रथम आलेली अंतरा कैलास नाक्ती,अनन्या नितीन डोंगरीवर, आर्या शैलेश माळी, ऋतीका शकेश सुर्वे, सायली दिलीप यांना संस्थेने विशेष प्रमाणपत्र त्यांना सन्मानीत करण्यात आले. शाळेची परंपरा ९८ टक्के निकाल लागला असून या निकालाने १४२ पैकी १३८ विद्यार्थी पास झालेले आहेत तर २१ विद्यार्थांनी७०% चा टप्पा पार केला आहे. 

      संस्थेचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर यांनी  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रतिकुल परिस्थितीत मात करून शिक्षक,पालक यांच्या मेहनीतीला दाद देवून शाळेचा नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपाली रोटकर यांनी केले तर विज्ञान शिक्षक संदेश चोरघे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर