कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर)मुरुडच्या सर एस ए हायस्कूलच्या एस एस सी १९८० विद्यार्थी विद्यार्थीनींचे गेट टुगेदर दि. २६ व २७ एप्रिलरोजी उत्साहात संपन्न झाले. ४५ वर्षानंतर आपापल्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता !
येथील श्रीयश हॉस्पिटल समोरील हॉटेल मध्ये छोट्याश्या शामियान्यात एक आठवणींचा हिंदोळा उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे शालेय काळातील जूने दिवस आठवण्यासाठी शहाळी, वडापाव, कुलफी, भेळ, बर्फाचा गोळा अशा तत्कालीन खाद्यपदार्थ यांचे स्टाल लावण्यात आले होते. त्याचा मनमुराद आनंद सगळ्या मित्रमैत्रिणींनी घेतला. तद्नंतर चिठ्ठ्या टाकून श्रीयश हॉस्पिटल च्या उद्घाटनाचा मान मंगेश या नावातील एम हे अक्षर मिळविणा-या मित्राला देण्याचे ठरले. डाॅ. मंगेश पाटील व त्यांच्या पत्नी सौ. अंजूम पाटील यांनी पुष्पवृष्टी करुन मित्रमैत्रिणींनींचे स्वागत केले तेव्हा सर्वच भारावून गेले. हॉस्पिटल ची फित कापण्याचा मान अभय पैर यांना मिळाला. सगळ्यांनी एकत्रित हॉस्पिटलचे अवलोकन केल्यानंतर कलिंगड च्या ज्युसने वातावरणात गारवा निर्माण केला. लकी ड्रा मध्ये विठ्ठल रखुमाई ची प्रतिमा जिंकलेल्या शुभांगी आंबुर्ले हीने गहिवरल्या स्वरात मनोगत व्यक्त करतांना वारकरी पंथाचा वारसा आपल्याला आपल्या वडिलांपासून लाभला असून सासर ही वारकरी पंथाचे असून आम्ही सारेच पांडुरंगचरणी लीन आहोत असे सांगताच सगळ्यांनी एका सुरात विठ्ठल नामाचा गजर केला.
मनोज चौलकर आणि डॉ. मंगेश हे देखील विठ्ठल प्रतिमेचे मानकरी ठरले. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारल्यानंतर रात्री मित्रमैत्रिणींनींचे ओळख, गप्पा, गोष्टी, कविता गाणी यांची मैफिल बागडे फार्म हाऊस इथे रंगली आणि वर्गमित्र प्रविण फायदे याने सर्वांना सुग्रास भोजनाचा आस्वाद दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पोपहारानंतर ४५ वर्षापूर्वीची माजी विद्यार्थी विद्यार्थीनींची फौज आपल्या शाळेत पोहचली आणि अनेक आठवणींना उजाळा मिळाला. सर एस ए हायस्कूल च्या पायरीवर सारेच नतमस्तक झाले. एका सुरात सरस्वती ची प्रार्थना म्हटल्यानंतर प्रमोद भगत ने सरस्वती वंदना गायली. सरस्वती पुजनानंतर शाळेची घंटा वाजवण्यात आली. सगळे विद्यार्थी विद्यार्थीनी शाळेच्या वर्गात बसले आणि प्रमुख सोहळ्याला सुरुवात झाली. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जंजिरा विद्या मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री राणे, प्रकाश मसाल सर, उपाध्ये बाई, मसालबाई, दिलीप दांडेकर सर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.सतत पाच वेळा नगरसेवक पदाचा बहुमान मिळालेले संजय गुंजाळ यांनी प्रास्ताविक मनोगतात गेट टुगेदर आयोजनाचा उद्देश आणि आयोजन प्रक्रियेचा आढावा घेतला, सुचेता कारखानीस (तत्कालीन दहावीत प्रथम आलेली विद्यार्थीनी), प्रणिता दवटे(शिक्षिका व समाजसेविका) , मंगेश दांडेकर (माजी मुरुड नगराध्यक्ष) , अभय पैर(साहित्यिक नाट्य सिने मालिका कलावंत), डाॅ मंगेश पाटील (माजी वैद्यकीय अधिकारी व श्रीयश हॉस्पिटलचे प्रमुख) यांनी आपल्या मनोगतात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देतांना प्रसंगी हास्य स्फोट घडविले तर अनेक प्रसंगानी डोळ्यांच्या कडाही ओलावल्या. प्रकाश मसाल सरांनी घेतलेली धमाल मस्तीकी पाठशाला सगळ्यांनाच भूतकाळात घेऊन गेली. जयंत सारंग यांनी आपल्या खुमासदार शैलीत ऋणनिर्देश व्यक्त केले. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन अभय पैर यांनी केले. मृदुल भगत ने तर आम्हाला माहेरपणाला आल्या सारखे वाटले अशा भावना व्यक्त केल्या. ४५ वर्षानंतर एकमेकांना भेटणा-या या मित्रमैत्रिणींनींच्या वागण्यात एवढ्या वर्षांच्या अनाकलनीय प्रदीर्घ कालावधीचा लवलेश नव्हता, होती ती ओढ, उत्कट आनंद आणि एकमेकांविषयी आदर. विजय सुर्वे यांनी संजीवनी डायलिसिस सेंटरला सगळ्यांची भेट घडवली. पुन:च्छ स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. निघतांना निरोप प्रसंगी सारेच मित्रमैत्रिणी भावूक झाल्याचे दिसून आले. या गेट टुगेदर मधून जमलेल्या गंगाजळीतून दरवर्षी दहावीला प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थीनी ला शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. हा सृजन स्नेह सोहळा यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सर्वश्री मंगेश दांडेकर, डाॅ. मंगेश पाटील, संजय गुंजाळ, उल्हास भगत (सर्व मित्र मैत्रिणींना एकत्र आणणं), प्रदीप बागडे (बागडे फार्म हाऊस), संदीप पाटील (समाज नगरसेवक ), नागेंद्र सिंग (जय हनुमान हॉटेल ), विकास भाटकर, अनंत वर्तक इत्यादी मुरुडकर वर्ग मित्रांनी विशेष मेहनत घेतली. आपल्या अर्धांगवायू वर मात करुन उपस्थित असलेला अमोल म्हात्रे आणि लालचंद जैन (लाल्या) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दरवर्षी अशाप्रकारे गेट टुगेदर चे आयोजन करुन त्यामार्फत शालेय सृजनात्मक कार्य केली जातील अशी ग्वाही सर्वानुमते देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या