Type Here to Get Search Results !

विहूर रस्त्यावर महाकाय वडाचे झाड कोसळले : सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली

 

कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) अलिबाग -मुरुड रस्त्यावर मोरे ते विहूर पेट्रोल पंप दरम्यान शेकडो वर्षे जुने असलेले महाकाय वडाचे झाड पहाटेच्या वेळेत रस्त्यावर आडवे कोसळले.यावेळेत वाहतूक तुरळक प्रमाणात असल्याने सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली !

  गेल्या दोन तीन दिवसांपासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने मुरुडमध्ये अक्षरशः थैमान घातले.यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, जनजीवन विस्कळित झाले. 

              आज पहाटे चारच्या सुमारास विहूर -मोरा दरम्यान रस्त्यावर वडाचे झाड पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.यामुळे अलिबाग -मुरुड रस्त्यावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली, दोन्ही बाजूकडून वाहनांच्या रांगा लागल्या, सकाळच्या वेळेत फळ, भाजी पाला, दूध, वृत्तपत्र यावर परिणाम दिसून आला, काही पर्यटकांचा हिरमोड झाला.याची माहिती शासकीय यंत्रणांना समजताच तहसीलदार रोहन शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित सांगळे, मुरुड पोलिस,रेस्क्यू टिम,नगरपरिषद कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चार ते पाच कटर मशीन, जेसीबी मशीन यांच्या साहाय्याने महाकाय वडाचे झाड हटविण्याचे काम सुरु केले आहे. हे झाड रस्त्यावरुन पटविण्यासाठी तीन ते चार तास लागतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

   पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यात या रस्त्यावरील जुनी झाडे, रस्त्यावर वाहनांना लागणा-या झाडाच्या फांद्या छाटणी करावी.याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करण्यात आली होती.मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आल्याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर