Type Here to Get Search Results !

मोरे गावातील पर्यायी रस्ता गेला वाहून * ठेकेदाराच्या हलगर्जी पणाबाबत ग्रामस्थांतून तीव्र नाराजी


कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीतील मोरे गावाला जोडणा-या नवीन पूलाच्या कामात काढण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला असून वेळेत काम पूर्ण न करणा-या संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जी पणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत तमाम ग्रामस्थांनी तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची व ठेकेदारावर उचीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

   मोरे गावातील जूना पूल मोडकळीस आल्याने याठिकाणी सन.२०२४ मधे भूमीपूजन होऊन फेब्रुवारी २०२५ सदरील पुलाच्या कामाला सुरुवात झाली.यावेळी पुलाला पर्यायी रस्ता काढण्यात आला होता.या.रस्त्याला ड्रेनेज न दिल्याने ग्रामस्थांनी ठेकेदाराला वेळोवेळी विनंती करुन सांगितले होते कि, पाणी जाण्यासाठी या रस्त्याला पाईप वापरून पाण्याचा मार्ग मोकळा करावा, परंतु या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने, अखेर दोन दिवस पावसाने घातलेल्या थैमानाने हा पर्यायी रस्ता वाहून मोरे गावाचा संपर्क तुटला आणि जनजीवन विस्कळित झाले.

    तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, बांधकाम अभियंता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, ग्रामस्थांच्या समस्या जाणून न घेता व समर्पक उत्तरे न दिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.९ तारखेपर्यंत गावात लग्न सराई असल्याने, प्रशासनाने या कामात दुर्लक्ष केल्याने गावाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.

   शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष मनीष माळी यांनी मोरे गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.सदरील ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी पूलाचे काम करणे गरजेचे होते, या पुलाच्या कामात संभाव्य पावसाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन पर्यायी रस्ता बांधण्याची गरज होती.यात हलगर्जी पणाचा फटका अखेर गावाला बसला आहे.

     शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालून तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.माजी सरपंच रमेश दिवेकर, ग्रामस्थ उद्देश कासारे यांनी आपला संताप व्यक्त केला.

  मोरे गाव अध्यक्ष जगदीश पाके,भाऊ दिवेकर,अनंत घाग, कैलास दिवेकर, नरेश दिवेकर, गणेश दिवेकर, राहुल दिवेकर, कृष्णा घोसाळकर, मनीष दिवेकर,निलिशा दिवेकर, माधुरी दिवेकर, शुभांगी पाटील, मनीषा दिवेकर, रुपाली दिवेकर यांसह ग्रामस्थ व महिला संख्येने उपस्थित होत्या.मोरे गावाला जोडणा-या नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला न झाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर