Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे सहाण येथे कृषी फलोत्पादन सिंचन सौर उर्जा परिषद व प्रदर्शन


खारेपाट,ता.२८(महेंद्र म्हात्रे)महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास येथे कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, दुग्धविकास सौरउर्जा परिषद व प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.  

    शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणेचे दृष्टीने देशाच्या बाजारात नव्यानेच पदार्पण झालेले टीआय क्लिन मोबीलीटी प्रा.लि.चेन्नई यांच्या इलेक्ट्रीक ट्रॅक्टरचे सादरीकरण करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे रायगड जिल्ह्यातील व कोकणातील शेतकऱ्यांनी उत्सफूर्तपणे स्वागत केले. 

मागील ५/६ वर्षे जागतिक हवामान बदलाचा (ग्लोबल वार्मिंग) आंबा भाजीपाला व सर्व प्रकारच्या उत्पादनाला ग्लोबल वार्मिंगचा बसत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन ६० ते ७० टक्के घटून ते अवघे ३० टक्क्यावर आहे आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी कोकणात मे च्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे प्रचंड प्रमाणात आंबा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले. या पार्श्वभुमीवर कोकणातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या समस्या मांडून त्या या व्यासपिठावरुन सोडविण्यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष (एमएसएमजीए) चे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रीक ट्रॅक्टरचे प्रभावी माध्यम, ड्रोन तंत्रज्ञान भविष्यातील शेतीसाठी काळाची गरज असल्यामुळे या तंत्रज्ञानाचा राज्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ समाजाच्या सर्व थरांत प्रयत्न करील असेही मोकल म्हणाले. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून सहसंचालक कृषी विभाग ठाणे बालाजी ताटे हे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते परिषदेचे व प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच सर्व प्रकारच्या फलोत्पादनातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे सांगून आंबा फळ पिक विम्यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे बरोबरच त्यांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल? यासाठी प्राधान्य देऊ.असे प्रतिपादन केले व शेतकऱ्यांनी इलेक्‍ट्रीक ट्रॅक्टर, ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा.असे आवाहन केले 

    . येत्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक भात बियाणे खते वेळेवर मिळावित यासाठी कृषी विभाग तत्पर असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून टी आय क्लिन मोबीलीटी प्रा.लि.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र प्रसाद के, हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रीक ट्रॅक्टर ही मुरुगप्पा ग्रुपची अभिनव निर्मिती आहे. हा एक क्रांतीकारी बदल घडविणारा ट्रॅक्टर आहे जो खास करुन भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला असल्याचे सांगितले.

टीआय क्लिन मोबीलीटी प्रा.लि.चे उपमहाव्यवस्थापक लक्ष्मीकांथ पत्रो यांनी इलेक्ट्रीक ट्रॅक्टरचे डिजीटल सादरीकरण केले तर सलाम किसान चे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. जीवाग्रो लि. चे महाराष्ट्र व्यवसाय प्रमुख अमित गायकवाड यांनी कृषी क्षेत्रासाठी आपल्या प्रभावी उत्पादनांची माहीती यावेळी उपस्थितांनी दिली. कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

प्रदर्शनात आंब्यासाठी हमखास व लवकर मोहोर यावा व उत्पादन वृध्दिसाठी सन अॅण्ड ओशन ग्रृप च्या वतीने तसेच डायना बायोटेक कंपनी लि. पुणे यांच्या उत्पादनाचे स्टॉल तसेच आदिवासी बांधवांची प्रिमियम उत्पादने असलेला शबरी नॅचरल ब्रँड व सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज लि. नाशिक यांचे स्टॉल उभारले होते.सुत्रसंचालन विनायक थळकर यांनी तर  विकास पाटील यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर