कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर)पावसाळा सुरु होतो तोच मुरुड मधील शासकिय कार्यालयांत होणाऱ्या गळतीला उपाय म्हणून छतावर प्लॅस्टिकचा वापर केला जातो आहे.
नेमेची येतो मग पावसाळा या प्रमाणे गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू होतो न होतो तोच मुरुड मधील तहसील कार्यालय,ग्रामीण रुग्णालयात गळती सुरू होते आणि या गळतीला उपाय म्हणून कार्यालयांच्या छतावर प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याचे मागील वर्षापासून दिसून येत आहे.
मुरुड तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, वनविभाग, पंचायत समिती, सेतू, ग्रामीण रुग्णालय विविध कार्यालये असून काही कार्यालयात महत्त्वाचे दस्तावेज असतात. शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणांहून शासकीय कामासाठी लोकांची लगबग असते. गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू झाला कि येथील कार्यालयांच्या गळतीला सुरुवात होते आणि मग त्यावर उपाय प्लॅस्टिकचा वापर केला जातो त्या ऐवजी येथील काही कार्यालयात पावसाळ्यात होणारी गळती कायमस्वरुपी थांबण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जनमानसातून जोर धरीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या