कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) दक्षिण कोकण किना-यावर पुर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र स्वरूपात परिवर्तीत झाल्याचा परिणाम मुरुडमध्ये काल मध्यरात्री नंतर पावसाला सुरुवात झाली, सकाळच्या वेळी कमी अधिक प्रमाणात पडल्यावर दुपार नंतर मुरुडसह नांदगाव मजगांव बोर्ली -मांडला परीसरात वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
मुरुड मध्ये आतापर्यंत 159.00 मी.मी.पावसाची नोंद झाली असून आज सकाळी 7.30 वाजेपर्यंत 35.00 मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाट पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच, वारा 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील.असे कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या