Type Here to Get Search Results !

महिलांनी सुरक्षित बाळंतपणासाठी 102 क्रमांकाचा वापर करावा : प्रा.डॉ.जयपाल पाटील

 

कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर)माहेरी आलेल्या आपल्या प्रथम बाळंतपणासाठी मुलींच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यखात्याच्या 102 रुग्णवाहिकेचा वापर कायम करा, त्याचबरोबर अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचा वापर करून महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर कायम करावा.असे अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीने आयोजित केलेल्या आपत्ती कार्यशाळेमध्ये प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 

      यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी सहाय्यक अधिकारी मोहन सूर्यवशी,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्रा. डॉ. जगपाल पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रदीप दिनकर,विश्वास तांडेल आरोग्य सेवक,प्रकाश घरत, माजी ग्रामपंचायत सदस्य, सौ. भाग्यश्री संतोष तेलगे, अध्यक्ष बचत गट आदी. मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकात ग्रामविकास अधिकारी प्रदीप दिवकर यांनी सांगितले कि, रायगड जिल्हा परिषद आणि रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे रायगड जिल्ह्यातील 811 ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थाना आपत्ती सुरक्षाचे मार्गदर्शन केले जाते, यासाठी आपत्ती कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आपणास जेथे जी माहिती मिळेल ती आपल्या शेजाऱ्यांनाही सांगावी. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शेतातील भात पिकांना खते आणि औषध वापरताना अनेक आपत्या निर्माण होतात त्यामुळे आरोग्याला धोका संभवतो, लहान मुलांच्या हातामध्ये शेतात लागणारी औषध त्यांचा हाताला लागू नये.अशा ठिकाणी सुरक्षित ठेवावी,खते मारताना मास्कचा अथवा रुमालाचा वापर करावा, शासनाच्या शेतीविषयक योजनांचा वापर करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे असे मार्गदर्शनात सांगितले. यावेळी डॉ. जयपाल पाटील यांनी सुरक्षित बाळंतपणासाठी 102 क्रमांकावर संपर्क साधताच,प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा येथून वाहन चालक चेतन चुनेकर हे 102 रुग्णवाहिकेसहित उपस्थित झाले. गावामध्ये अनेकांची घरे टेकड्यांवर असल्याने महिला,जेष्ठ नागरिक, यांना रुग्णवाहिकेपर्यंत हाताची घडी, घरातील चादरीमध्ये कसे आणावयाचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले, साप व विंचू दंश झाल्यास घ्यावयाची काळजी, घरातील गॅस सिलेंडरची नळीची शेवटची (एक्सपायरी डेट) काळजी कशी घ्यावी, याची माहिती, घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या औषधांच्या गोळ्यांसाठी वेगवेगळे डबे ठेवण्याची माहिती, ज्यामुळे आपत्ती येऊ नये, सध्या पावसाची चिन्ह असल्याने विजा कोसळून आपत्ती येऊ शकते यासाठी केंद्र सरकारने दामिनी ॲपची निर्मिती केली आहे,तो आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावा, अचानक चक्रीवादळ येत असल्याने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करून आपल्यावर आपत्ती येणार नाही हे पाहावे असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले, ग्रामपंचायतीत झालेला कार्यक्रम लाऊड स्पीकर द्वारे आख्या गावातील नागरिकांना ऐकवण्यासाठी ठेवला होता यासाठी ग्रामविकास अधिकारी यांना त्यांनी धन्यवाद दिले. कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र घरत, अनंत पाटील, कु.शुभांगी पाटील ग्रामपंचायतीचे कर्मचारी,विकास रणपिसे आपत्ती सुरक्षा मित्र यांनी विशेष परिश्रम घेतले तर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश घरत यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर