मुरुड,ता.२१(पांडुरंग आरेकर)रायगड जिल्हा हा नैसर्गिक मानव निर्मित बहु प्रवण क्षेत्र आहे येणाऱ्या मान्सून कालावधी मध्ये आपत्ती प्रवण गावामध्ये पूर्व तयारी करणे ,जन जागृती करणे,तात्काळ प्रसिद्धी देणे इ.कामासाठी आपले मित्र व सखी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना सुरक्षा मिळावी.यासाठी रायगड जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी विशेक्षतः समुद्र किनार पट्टीत येणारे पर्यटक व नागरिक यांच्या सुरक्षितते संदर्भांत बुडणाऱ्या व्यक्तीस वाचवणे,सर्प दंश,आग लागणे, हार्ट ॲटॅक येणे, फीट येणे,पूर येणे इ. आपत्तीजन्य परिस्थितीत आपण नागरिकांना कशा प्रकारे सुरक्षित ठेवू शकतो या संदर्भात प्रत्येक बाबतील प्रथमामचाराचे प्रात्यक्षिक एन डी आर एफ च्या टिम कडून मुरुड तालुक्यातून सरपंच ,ग्रामसेवक,पंचायत समिती,नगर परिषद कर्मचारी,पोलीस कर्मचारी यांना नगरपरिषद हॉलमध्ये मॉकड्रिल करून प्रात्यक्षिक दाखविण्यांत आले.या साठी नागरी संरक्षण दलातील मनोहर म्हात्रे यांनी स्वतः प्रत्यक्षात प्रात्यक्षिक सर्व सहकार्याच्या माध्यमातून करून दाखविले.सदर प्रक्षिणक्षासाठी सरपंच, तलाठी,ग्रामसेवक कोतवाल पोलीस पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते .मुरुड नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक नंदकुमार आंबेतकर यांनी नायब तहसीलदार राजश्री साळवी, पोलिस निरीक्षक प्रतिनिधी अविनाश पाटील , प्रशिक्षक मनोहर म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या