कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर) मुरुड जंजिरा पर्यटनात लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ असलेल्या महाराष्ट्रात मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला पावसाळ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 26 मे 2025 पासून 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पर्यटकांना पाहण्यास बंद ठेवण्यांत येणार असल्याची माहिती अलिबाग- मुरुड पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी बोलताना दिली. पावसाळ्यात खोराजेट्टी अथवा राजपुरी जेट्टीवरून बाहेरून पाहता येईल मात्र समुद्रात जाण्यास बंदी असेल.
येलीकर पुढे म्हणाले की समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणास्तव दरवर्षी जंजिरा जलदुर्ग 25 किंवा 26 मे, पासून पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद केला जातो. पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची आहे. या कालावधीत समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शासकीय स्तरावरून निर्णय घेतला जातो. 26 मे पासून जंजिऱ्याचे दरवाजे बंद करावेत अशा स्वरूपाचे आदेश मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व खात्याला प्राप्त झाले आहेत. त्या नुसार निर्णय घेतला जाईल.अशी माहिती येलीकर यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या