Type Here to Get Search Results !

प्रत्येक युवक युवतींना युद्धजन्य सरावाची माहिती असणे आवश्यक आहे - डॉ. जयपाल पाटील

 

कोर्लई,ता.११(राजीव नेवासेकर)पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण पाहावयास मिळत असून भारत पाकिस्तान मध्ये तणाव वाढला आहे भारताने कडक  भूमिका घेतली असून आपण अरबी समुद्रकिनारी रहात असल्याने आपणास ही धोका आहेच अशा वेळेस समजा मॉम स्फोट झाला तर जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना 108 रुग्णवाहिका बोलावून मदत करावी म्हणजेच युद्धजन्य सरावाचा एक भागाचा अनुभव आपण आज घेतला असे मार्गदर्शन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांनी घरात क्लासेस मध्ये आयोजित केलेल्या आपत्ती कार्यशाळेत 80 विद्यार्थी व पालक यांना सांगितले. प्रारंभी घरत क्लासेसचे प्राचार्य घरत सर यांनी डॉ. जयपाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर पहेलगाम हल्ल्यात पर्यटकांचे मृत्यू झाले त्यांना श्रद्धांजली वाहून संविधानाचे वाचन करून घेतले. समजा अत्याधुनिक ड्रोन च्या काळात कुठे स्पोर्ट झाला तर जखमींना प्रथमोपचार कसा करावा, त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत कसे न्यायचे यासाठी 108 रुग्णवाहिके साठी जिल्हाप्रमुख डॉ. अजय जगताप यांना फोन करून  बोलावण्यात आली, पेण येथून डॉ. अजित बर्गे व पायलट संजय पालवणकर यांचे आगमन होऊन डॉ. अजित बर्गे व डॉ. जयपाल पाटील यांनी जखमींवर औषध, पट्ट्या कशा बांधाव्या याची प्रत्यक्ष दिले. यावेळी तरुण मुले मुली वाहतूक परवाना नसताना आई-वडिलांची दोन चाकी अथवा चार चाकी वाहने करतात आणि अपघात ग्रस्त स्वतः व इतरांना करतात यासाठी देशभरात झालेल्या नवीन कायद्यांची माहिती रायगड वाहतूक पोलीस खात्याचे हवलदार श्री. प्रशांत म्हात्रे यांनी मोटर वाहन कायद्याच्या नवीन दंडांची माहिती देऊन त्यांचे सहकारी श्री. मंगेश कावजी यांनी रस्ता सुरक्षा ची मुलांना माहिती पत्रके दिली. सध्याच्या काळात अंतराळ व ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून युद्ध केली जातात आपल्याकडे काही होत नाही अशी भावना न ठेवता लष्करी सराव हा देशाच्या सुरक्षेची तयारी असते. त्यामुळे आपल्या समुद्रकिनारी, एस टी स्टॅन्ड, सुंदर बॅग, बॉक्स यांना न उघडता आपल्या स्थानिक पोलिसांना याची माहिती द्यावी. आपला भारत देश हा शांततेचा पुरस्कारता  देश आहे. सायंकाळी देशभरात होणाऱ्या मॉक ड्रिल हे शांततेसाठी युद्धाची तयारीचा भाग म्हणून राबविण्यात येत आहे आपल्या देशाच्या सीमेवर तिन्ही सैन्यदले सतर्क आहेत. समजा आपल्या गावात शेजारी असे चुकून अघटीत घडले तर आपणही देशसेवा करण्याच्या तयारीत राहिले पाहिजे, भारतीय सैन्याचे भूदल,नेव्ही, एअर फोर्स आणि पोलीस हे त्यांचे काम करतात मात्र आपणही आपली मानसिकता देशसेवेची ठेवली पाहिजे. असे सांगून मुलीं आणि महिलांसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांक, बाळंतपणासाठी महाराष्ट्र योग्य खात्याची 102 रुग्णवाहिका, सध्या पावसाळा येत असल्याने आकाशामध्ये विजा चमकून पडण्याचा धोका असतो यासाठी भारत सरकारने दामिनी ॲप निर्माण केला असून तो आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावा. तसेच कायम सरकारने दिलेल्या सूचना ऐकाव्यात सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, त्यामुळे आपल्यावर आपत्ती येईल व आपले पुढील जीवन अंधार मय होईल याची दक्षता घ्या, कार्यक्रम यशस्वी करण्यास आपत्ती मित्र विकास रणपिसे, घरत क्लासेसचे राहुल म्हात्रे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर