मुरुड,ता.१२(नरेश वारगे) मुरुड तालुक्यातील वावडुंगी वरचीवाडीत प्रसिद्ध असलेल्या श्रीहनुमान मंदिराला शंभर वर्षे पूर्ण झाली असून ग्रामस्थांच्या वतीने शतकोत्तर महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
यानिमित्ताने शनिवार दि. १० मे २०२५ रोजी काकड आरती,अभिषेक व श्री सत्यनारायणाची महापुजा,महाआरती,महाप्रसाद,पालखी सोहळा,उपस्थितांचे स्वागत सोहळा,हरिपाठ माऊली हरिपाठ मंडळ, खार-आंबोली-मुरुड-जंजिरा गायनाचार्य दिनेश महाराज गोसावी,विकास महाराज कमाने पखवाज वादक अंकेश महाराज पाटील यांची साथ लाभली.पंढरपुर येथील किर्तनकार : ह.भ.प.सौ. गौरीताई महाराज सांगळे यांच्या सुश्राव्य बहारदार किर्तनाने रसिकजनांची मने रिझवली! तसेच रविवार दि. ११ मे २०१५ रोजी भगवान बजरंगबली प्रवचन महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ,महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागत समारंभ व सुस्वर भजनाचा कार्यक्रम झाला.यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे औचित्य साधून मनोरंजनात्मक कुणबी युवा मुंबई निमित्त... कुणबी कलामंच प्रस्तुत... मुंबईतील प्रसिद्ध नाटक...
संघर्ष जगण्याचा व लक्षवेधी एकलव्याच्या ध्येयपुर्तीचा दाखविण्यात आले.
राज्यसभा खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, मुरुड तालुका अध्यक्ष शैलेश काते, विधानसभा विस्तारक नरेश वारगे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे, शिवसेना नेते विघ्नेश माळी,तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,नियोजन मंडळ सदस्य निलेश घाटवळ, नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, महिला जिल्हा प्रमुख तृप्ती पाटील, उपतालुका प्रमुख मनोज कमाने,संघटक दिनेश मिणमिणे, दिपेश वरणकर, युवा तालुका प्रमुख अमोल लाड, संतोष पाटील,, वरचीवाडी वावडुंगी गाव अध्यक्ष मधुकर भुवड, सचिव नथूराम भेकरे, मुंबई मंडळ अध्यक्ष सचिन भुवड, सचिव प्रमोद उदेक, महिला मंडळ अध्यक्ष संचिता भुवड, सचिव प्रतीक्षा उदेक,गावातील पदाधिकारी, शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या